Premium|Coffee Memories : बालपणापासून स्टारबक्सपर्यंतचा सुगंधी प्रवास: आठवणी, नाती आणि कॉफीप्रेमाची गोष्ट

Coffee nostalgia story : लहानपणी समारंभापुरती खास असलेली कॉफी आज सहज उपलब्ध झाली आहे. तरीही तिचा सुगंध, पावसाळी क्षण, फिल्टर कॉफी, कॅपुचिनो आणि लाटेच्या आठवणी मनात कायम आहेत.
Coffee nostalgia story

Coffee nostalgia story

esakal

Updated on

प्राची गावस्कर

चहा सर्रास, कॉफी खासम्‌खास... असं समीकरण घेऊन माझ्या आयुष्यात आलेली कॉफी कायमच आपलं हे अप्रुपाचं स्थान काळाच्या ओघात अधिकच पक्कं करत गेली आहे. आमच्या लहानपणी कॉफी पिणं ही अतिशय अप्रुपाची गोष्ट होती. घरात पूजाअर्चा, उपवास, हळदीकुंकू असे काही समारंभ असतील, तर कॉफी केली जात असे, त्यामुळे ती अगदी खास होती. रोज कॉफी पिणं फक्त श्रीमंत लोकांच्या घरात शक्य असे. त्यामुळे कॉफी म्हणजे अपूर्वाईची गोष्ट असल्यानं ती मिळाल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असे. आज कोणत्याही किमतीची कॉफी पिणं सहजशक्य झालं आहे. तरीही लहानपणी अपूर्वाईची असलेल्या कॉफीच्या सुगंधाची आठवण मन प्रफुल्लित करते आणि कॉफीबद्दलचं प्रेम अधिकच घट्ट होतं.

‘कॉफी’! शब्द उच्चारला तरी माझ्या नाकाला कॉफीचा काहीसा कडवट, थोडासा उग्र दरवळ जाणवतो आणि माझं मन अगदी प्रसन्न होतं. मेंदूला जणू नव्या ऊर्जेचा पुरवठा होतो अन् मन कॉफीच्या अनेक आठवणींमागे धावत सुटतं... कधी लहानपणीच्या, तर कधी तरुणपणातल्या मोहरून टाकणाऱ्या कॉफीच्या आठवणींमध्ये रंगून जात मग हातात असलेली कॉफी अधिकच झकास लागू लागते. बाहेर काळ्याशार ढगांची दाटी, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणधारा आणि खिडकीच्या काचांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, हातात कॉफीचा भलामोठा मग आणि मागे लागलेली सुरेख गाणी असतील... सुख म्हणजे नक्की काय असतं, या प्रश्‍नाचं उत्तर म्हणजे हेच क्षण असं सांगता येईल. मस्त पावसाळी हवेत चहा आणि भजी प्रिय तशी कॉफीही मला अतिशय प्रिय आहे. अनेकदा माझी पसंती कॉफीलाच असते. दाक्षिणात्य चवीची फिल्टर कॉफी असो, वा एखाद्या सुरेखशा कॅफेत जाऊन कॅपुचिनो किंवा लाटे किंवा आणखी कोणतीही कॉफी पिणं माझी अगदी आवडीची गोष्ट आहे. याला कारण लहानपणापासून कॉफीशी जुळलेल्या आठवणीच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com