

Conscious Communication in Relationships
esakal
परिस्थितीची, भवतालाची जाणीव ठेवून संवाद साधणं हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. काय बोलायचं, केव्हा बोलायचं, कुणासमोर बोलायचं, कुणासमोर बोलायचं नाही, हे कळणं म्हणजेच कॉन्शिअस कम्युनिकेशन.
हल्ली कुठल्याही नात्यामध्ये ‘अंडरस्टँडिंग’ असलं पाहिजे, म्हणजे समोरचा समजूतदार असला पाहिजे, असा आत्ताच्या तरुण पिढीचा आग्रह असतो. पण हे लक्षात घ्यायला हवं, की समजूतदारपणा हा पुढचा टप्पा आहे. त्याआधी सुरुवात ही नेहमी स्पष्ट संवादापासून व्हायला हवी. आपले विचार समोरच्यापर्यंत नीट पोहोचणं आणि त्याचे विचार ऐकून घेणं हाच कोणत्याही नात्याचा गाभा आहे.