Premium|Mental Health Awareness 2026 : ताणतणाव फक्त मनात नसून शरीरावरही करतो आघात! जिम आणि डाएट असूनही तरुणांना हार्ट अटॅक का येतोय?

Benefits of Counseling and Psychiatric Medicine : बदलत्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज बनली असून, डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डर सारख्या समस्यांवर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आणि औषधोपचार घेतल्यास जीवघेणा ताण कमी करून आनंदी आयुष्य जगता येते.
Mental Health Awareness 2026

Mental Health Awareness 2026

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

काही लोकांना अपयश सहज पचवता येत नाही. ते अपयशानं पार खचून जातात. इतके की त्यामुळे त्यांना शांत झोप लागत नाही, त्यांची भूक मंदावते, कोणतीही नवीन गोष्ट करायला त्यांना आवडत नाही किंवा काहीवेळा आपण निरुपयोगी आहोत, असंही त्यांना वाटतं. अशावेळी हे डिप्रेशन कमी करण्यासाठी काउन्सिलिंगबरोबरच औषधं देऊन त्यातून त्यांना बाहेर काढता येतं.

‘‘मिनू हे जरा आजीला आत नेऊन दे गं.’’ आईनं दिलेली गरमागरम पोह्यांची प्लेट घेऊन मिनू आजीच्या खोलीत शिरली. आजी खोलीत काहीतरी आवराआवर करत आहे हे पाहून मिनू म्हणाली, ‘‘आजी हे काय करतीयेस? तुला बरं नाही ना. काही हवं असेल तर मला आवाज द्यायचा ना.’’

‘‘अगं मी बरी आहे आता. चल ते पोहे आपण बाहेर बसून खाऊयात. मला ना दोन दिवस खोलीत बसून खूप कंटाळा आलाय. बाहेर तुमच्यासोबत बसलं की तेवढंच जरा फ्रेश वाटतं.’’

आजी आणि मिनू बाहेरच्या खोलीत आल्या.

Mental Health Awareness 2026
Premium|Social Media: सोशल मीडियाच्या व्यसनाधीन अल्गोरिदमविरुद्ध कॅलिफोर्नियातील खटला, मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com