World Map
Esakal
प्रासंगिक। भावेश ब्राह्मणकर
सध्या प्रचलित असलेल्या जागतिक नकाशाला आव्हान देत ५५ देशांनी ‘करेक्ट द मॅप’ ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेमुळे एक मोठा प्रश्न समोर आला आहे. अचानक असे काय घडले? आपण वापरत असलेला सध्याचा नकाशा नेमका कधी आणि कसा तयार झाला? त्यात कोणते बदल अपेक्षित आहेत, आणि त्याचे परिणाम काय असतील, यावर विवेचन करणारा हा लेख...
‘आपण सध्या पाहत आणि वापरत असलेला जगाचा नकाशा चुकीचा आहे; त्यात बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच ‘करेक्ट द मॅप’ या मोहिमेला जगभरातून पाठिंबा मिळायला हवा,’ असे आवाहन तब्बल ५५ देशांनी केले आहे. हे सर्व देश प्रामुख्याने आफ्रिका खंडातील असून त्यांच्या नाराजीचे मूळ कारण म्हणजे नकाशावर दाखविण्यात आलेला त्यांच्या खंडाचा आकार व प्रमाण. अर्थात, ही जगाच्या नकाशावर होणारी पहिलीच टीका नाही. यापूर्वीही विद्यमान नकाशावर आक्षेप घेतले गेले होते; मात्र यावेळी मोहिमेची धार अधिक तीव्र आहे. त्यामुळे लवकरच जगाचा नकाशा बदलू शकतो किंवा अधिक अचूक व सुधारित नकाशा सर्वांना उपलब्ध होऊ शकतो.