Premium|Cotton Fabric : फॅशनविश्वात कॉटन फॅब्रिकला विशेष मागणी का? कापूस आणि विविध तंतूंपासून कापड तयार होण्याची गोष्ट

Cotton Fabric Manufacturing Process : फॅशनविश्वात कॉटन फॅब्रिकला कायम मागणी असून, विविध तंतूंपासून धागे तयार करून विणकाम, रंगकाम, छपाई आणि शिवणकामातून परिधानयोग्य कापड तयार केले जाते.
Cotton Fabric Manufacturing Process

Cotton Fabric Manufacturing Process

esakal

Updated on: 

वैष्णवी वैद्य-मराठे

सध्याचे युग फॅशनचे आहे. हे क्षेत्र असेच वृद्धिंगत होत राहणार आहे. अशातही, फॅशनविश्‍वाच्या मुळाशी असलेले कॉटन फॅब्रिक सदैव लोकांच्या पसंतीस उतरत राहील यात शंका नाही. लोकांचे वाढते कॉटनप्रेम लक्षात घेऊन हे कापड तयार करण्याच्या प्रक्रियेचा थोडक्यात आढावा...

कॉटन वस्त्रोद्योगाचा पायाभूत कच्चा माल म्हणजे विविध प्रकारचे तंतू. विविधरंगी तंतूंचा वापर करून स्पिनिंगद्वारे धागे तयार करणे, त्या धाग्यांचा कौशल्यपूर्वक वापर करून वीव्हिंगद्वारे कापडनिर्मिती करणे, ते अधिक सुंदर दिसावे यासाठी डाइंग, प्रिंटिंग करणे आणि त्यानंतर तयार झालेले फॅब्रिक शिवून परिधान करण्याजोगे कपडे तयार करणे ही वस्त्रनिर्मिती प्रक्रिया.

कापूस आणि लोकर या नैसर्गिक तंतूंपासून फार पूर्वीपासून वस्त्रनिर्मिती होत आहे. त्याच्या जोडीला आता अनेक कृत्रिम तंतू तयार करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. तरीही आज कॉटनला विशेष मागणी असते. कॉटन फॅब्रिक तयार करण्यासाठी कापूस अत्यंत महत्त्वाचा तंतू आहे. याला सीड फायबर असेही म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com