Premium|Cow Dung CNG : शेणापासून बायोमिथेन ते स्वस्त सीएनजी; डेअरी, शेतकरी आणि उद्योगांना जोडणारा उत्तर गुजरातचा हरित प्रयोग

Banaskantha Green Energy : गुजरातमधील बनासकंठा येथे शेणापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. दुग्धव्यवसाय, सेंद्रिय खत, स्वदेशी ऊर्जा उत्पादन आणि परकीय चलनाची बचत यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते.
Banaskantha Green Energy

Banaskantha Green Energy

esakal

Updated on

आ. श्री. केतकर

भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. येथे गुरांची संख्या खूप मोठी आहे. दुभत्या जगावरांप्रमाणेच भाकड जनावरांपासूनही शेण उपलब्ध होते. म्हणजे यात दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचाही फायदा आहे. शिवाय भाकड जनावरे अगदीच काही निरुपयोगी ठरत नाहीत. हरित प्रकल्पांमुळे सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेतही मोठी वाढ होईल.

अमेरिका आणि इस्राईल यांच्या इराणविरुद्धच्या युद्धामुळे आपल्याकडे डिझेल, पेट्रोल, गॅस या प्रमुख ऊर्जास्रोतांची टंचाई निर्माण झाली होती. त्यानिमित्ताने सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचाही वापर वाढविण्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला. पण सीएनजीचा वापर वाढवायचा, तर त्यासाठी त्याची निर्मितीही वाढवायला हवी. यासाठी परदेशांवर अवलंबून न राहता देशातच याचे उत्पादन वाढवता येणे शक्‍य आहे, आणि योग्य नियोजन केले तर देशभर असे प्रकल्प राबवता येतील. त्यामुळे ऊर्जेच्याबाबतीत आपला देश अधिकाधिक स्वावलंबी होईल. परकीय चलनही वाचेल. असाच एक प्रकल्प उत्तर गुजरातमधील डेअरी जिल्हा म्हणजे दुभत्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनासकंठा जिल्ह्यातील भुखाला या छोट्या शहरात सुरू आहे. त्याबाबत माहिती देणारा हा लेख.

प्रत्येकी तीन ते चार टन शेण वाहून नेणारे ट्रॅक्‍टर उत्तर गुजरातमधील बनासकंठा भागातील एकमेव औद्योगिक केंद्राच्या दारातून आत जातात. हे केंद्र भुखाला येथे आहे. जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेल्या भाषणात या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. येथे कार्यरत असलेल्या एका प्रकल्पात जमा झालेल्या शेणामध्ये प्रथम पाणी मिसळून ते मिश्रण एका प्रचंड मोठ्या टाकीत ओतले जाते. टाकीमध्ये ओतलेल्या या मिश्रणातून नैसर्गिक गॅस म्हणजेच मिथेन तयार होतो, हे अनेकांना माहीत असते. पण अगदी नेमके सांगायचे, तर येथे बायोमिथेन गॅस तयार होतो. तो शुद्ध करून साठवला जातो आणि त्यातील बहुतेक विकलाही जातो. या प्रकल्पाबाहेर हा बायोमिथेन सीएनजी म्हणून ओळखला जाणारा गॅस भरून घेण्यासाठी अनेक वाहने उभी असतात. हा बायोमिथेन प्लांट बनास डेअरी युनियन (स्थानिक जिल्हा डेअरी युनियन), राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (एनडीडीबी) आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांनी सुझुकी रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इंडिया (एसआरडीआय) या त्यांच्या विभागाच्या साहाय्याने हा प्रकल्प सुरू केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com