अश्विनी विद्या विनय भालेरावघरसजावटीमुळे आलेलं सौंदर्य दिवाळीच्या मांगल्यात भर घालतं. घरच्या सर्वांनी मिळून केलेली घरसजावट केवळ सणापुरतं घराचं सौंदर्य नाही वाढवत, तर पुढच्या अनेक वर्षांसाठी असंख्य खास आठवणी देऊन जाते....उत्साह, चैतन्य, मांगल्य घेऊन येणारा, नवी ऊर्मी, जल्लोषमय वातावरण निर्माण करणारा, आपल्या सगळ्यांना हवाहवासा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत घराघरांत फराळाची रेलचेल, नातेवाइकांची उठ-बस, सजावटीची लगबग सुरू असते. आरास, सुशोभन, सजावट करत आपण प्रत्येक सण खुलवत असतो. त्यातही दिवाळी म्हटल्यावर तर विशेषच तयारी केली जाते. निरनिराळ्या प्रकारच्या पणत्या, तोरणं, रांगोळ्या आणि लायटिंग या सजावटीतल्या महत्त्वाच्या गोष्टी. त्या सण-उत्सवादरम्यान घराला एक वेगळीच ओळख देतात. यंदाच्या वर्षी पारंपरिक सजावटीबरोबरच आणखी काय करता येईल याविषयी काही टिप्स....रोषणाई... दिवाळीचा अविभाज्य घटकघराघरांत आपापल्या परीनं विजेच्या माळा, आकाशकंदील वापरून रोषणाई करून दिवाळीची रंगत वाढवली जाते. पणत्या आणि दिव्यांच्या पारंपरिक पर्यायांव्यतिरिक्त आज अनेकविध पर्यायांनी बाजारपेठ सजलेली दिसते..१ आकाशकंदील : रेडिमेड कंदिलांबरोबरच आपण टाकाऊतून टिकाऊ असे घरगुती आकर्षक आकाशकंदीलदेखील करू शकतो. रंगीत कागद, बांबूच्या काड्या, वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स कापून त्यावर पारदर्शक रंगीत कागद चिकटवून कंदील तयार करता येऊ शकतो. पर्यावरणपूरक कंदिलासाठी फिकट रंगाच्या ओढणीचा अथवा साड्यांचा वापरही केला जाऊ शकतो. कुटुंबासमवेत असे प्रयोग केले, तर सणाची मजा द्विगुणित व्हायला आणखी मदत होऊ शकते..२ स्ट्रिंग लाइट्स : हे बारीक एलईडी बल्ब असलेले लाइट्स खिडक्या, बाल्कनी किंवा भिंतींवर लावल्यावर एक जादुई वातावरण झाल्यासारखं वाटतं. स्ट्रिंग लाइट्समुळे घराच्या बाहेरील भागही अधिक सुंदर दिसण्यास मदत होऊ शकते.३ एलईडी स्ट्रिप्स : दिवाळीसाठी छताला किंवा कपाटांना एलईडी स्ट्रिप्स लावून घराला एक आधुनिक आणि क्लासी लुक देता येऊ शकतो. याशिवाय तळहाताएवढे लहान फोकस लाइट्सदेखील विविध रंगांसह उपलब्ध असतात. त्यांचाही वापर दिवाळीत खास ठरेल.पणत्या... प्रकाशाचा आणि परंपरेचा संगमपणत्या म्हणजे केवळ मातीचे लहान दिवे नव्हेत, तर त्या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. दिवाळीमध्ये पणत्या लावून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पणत्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. साध्या मातीच्या पणत्यांपासून ते रंगीत, नक्षीदार आणि कलात्मक पणत्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत..१. पारंपरिक पणत्या : या मातीच्या पणत्या कोणत्याही सजावटीला एक नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्पर्श देतात.२. रंगीत पणत्या : या पणत्या विविध रंगांनी रंगवलेल्या असल्यामुळे दिवसाही सुंदर दिसतात. रात्री त्यांची शोभा अर्थातच अधिक वाढते.३. डिझायनर पणत्या : हल्ली बाजारात वेगवेगळ्या आकार आणि डिझाईन्सच्या पणत्या उपलब्ध आहेत. या पणत्या मोती, आरसे किंवा चमचमणाऱ्या वस्तूंनी सजवलेल्या असतात. प्रज्वलित न करता नुसत्या शोभेसाठी ठेवल्या तरी त्या छान दिसतात.४. पणत्यांचं डिझायनर रूप : डिझायनर पणत्यांचं रूप आपण घरीदेखील साकारू शकतो. मातीच्या साध्या पणत्यांना आपल्याला हव्या असलेल्या रंगांसह, अॅक्रॅलिक रंगांनी रंगवून, त्यावर कुंदन, बारीक आरसे, मोती यांचा साज चढवून आपण घरच्या घरी आकर्षक पणत्या तयार करू शकतो..तोरणं... स्वागताची आणि मांगल्याची खूणघराच्या मुख्य दरवाजावर लावलेलं तोरण म्हणजे मांगल्याचं प्रतीक. तोरण पाहुण्यांचं स्वागत करतं आणि घराच्या प्रवेशद्वाराला एकआकर्षक स्वरूप देतं. तोरणांचे अनेक प्रकार आहेत...१. फुलांचं तोरण : पिवळ्या-केशरी झेंडूची फुलं, गुलाब आणि आंब्याची पानं वापरून केलेलं तोरण पारंपरिक लुक तर देतंच, शिवाय मांगल्याची खूण म्हणूनही याकडे पाहिलं जातं. या नैसर्गिक पारंपरिक तोरणांचा सुगंध आणि रंग दोन्ही मन प्रसन्न करतात. यातही आपण वैविध्य आणून आकर्षक डिझाईन्स साकारू शकतो.२. मण्यांचं तोरण : हे तोरण वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांपासून तयार केलेलं असतं. आधुनिक शैलीचं इंटेरिअर असेल, तर हे तोरण एक चांगला पर्याय ठरतं..थोडक्यात नवी मुंबई.३. कलात्मक तोरण : आजकाल क्रोशे, लोकर, फॅब्रिक आणि वेगवेगळ्या धातूंचा वापर करून विविध प्रकारच्या तोरणांची निर्मिती केली जाते. धातू किंवा लोकरीपासून तयार केलेल्या तोरणांमध्ये अनेक डिझाईन्स उपलब्ध असतात. पारंपरिक तोरणांसह कलात्मक तोरणांचा वापर करून आपण आपली दिवाळी खास करू शकतो.घरसजावटीमुळे आलेलं सौंदर्य दिवाळीच्या मांगल्यात भर घालतं. घरच्या सर्वांनी मिळून केलेली घरसजावट केवळ सणापुरतं घराचं सौदर्य नाही वाढवत, तर पुढच्या अनेक वर्षांसाठी असंख्य खास आठवणी देऊन जाते....सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.