

Mushroom Chaat Recipe
esakal
वैशाली खाडिलकर
साहित्य
एक कप भाजलेला दलिया, अर्धा कप भिजवलेले पोहे, अर्धा कप उकडलेल्या रताळ्याचा लगदा, ३ ते ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ मध्यम आकाराचा कांदा, ५ ते ६ लसूण पाकळ्या, २ टेबलस्पून कैरीचा कीस, १ टीस्पून गूळ पावडर, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप नारळाचा चव, पाव कप काजूचे तुकडे, गरजेनुसार तेल व रवा, चवीनुसार मीठ.
कृती
गॅसवर पापड भाजण्याची जाळी ठेवून त्यावर कांदा, लसूण व हिरव्या मिरच्या मंद आचेवर भाजून घ्याव्यात व त्यांची पेस्ट करावी. एका वाडग्यात दलिया, पोहे, कैरीचा कीस, कोथिंबीर आणि नारळाचा चव, गूळ पावडर घेऊन मिश्रण एकजीव करावे. या मिश्रणात कांदा, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालावी आणि मिश्रण पुन्हा एकत्र करावे. आता या मिश्रणाचा एक मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटावी. कटरच्या मदतीने हार्ट शेपमध्ये कटलेट्स कापावीत. प्रत्येक कटलेटवर एक काजू लावावा. प्लेटमध्ये रवा घेऊन त्यात हे कटलेट्स घोळवून घ्यावीत. पॅनमध्ये तेल तापवून कटलेट्स दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावीत.