
किशोर पेटकर
चाळिसाव्या वर्षीही आपले वर्चस्व सिद्ध करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणखी दोन वर्षे अल नासर क्लबसोबत खेळणार आहे. दोन हजार कोटींचा करार व १५ टक्के मालकी हक्क मान्य करून त्याने ४२व्या वर्षापर्यंत मैदानात राहण्याचा निर्धार दाखवला. विश्वकरंडक जिंकण्याचे अपूर्ण स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची त्याची आसही कायम आहे.