

Crude Oil Prices
esakal
भूषण महाजन
भारतासाठी असलेला करार आता ता. ३० एप्रिल २०४९पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे नवीन उत्पादनात विस्तार करण्याची लवचिकता मिळाली आहे. म्हणजे पेप्सिकोबरोबरची मजबूत भागीदारी वरुण बेव्हरेजेसच्या आजच्या व्यवसायाचा पाया आहे; पण कंपनीची महत्त्वाकांक्षा आता त्या पायावर आणखी मजले बांधण्याची आहे.
सन १९५२रोजी गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या अजरामर संगीत शारदा या मराठी नाटकातील अत्यंत भावस्पर्शी नाट्यगीत आहे - ‘ही हाक आहे एका असहाय्य मुलीच्या हतबलतेची! त्याकाळच्या समाजातील एका अमानुष प्रथेविरुद्धची!’ हे गीत आज आठवायचे कारण म्हणजे, आज भारतीय गुंतवणूकदारासमोर अशीच भीती उभी राहिली आहे. आधीच अमेरिकेच्या व तितक्याच तोडीस तोड इराणच्या एकमेकांविरुद्ध सुरू असलेल्या वल्गना आणि त्यातून सतत वाढत असलेला खनिज तेलाचा भाव महागाईला आवतण घालत आहे. त्यात आपण तेल कुठून खरेदी करायचे, हे इतरेजन ठरवणार. आपण ८५ टक्के खनिज तेल आयात करतो. ते रशियाकडून स्वस्तात घ्यायचे नाही, घेतल्यास परिणामांसाठी तयार राहा, ही अमेरिकेची धमकी झुगारून आपण आपली खरेदीची स्वायत्तता अजूनही टिकवून आहोत. परिणामस्वरूप, अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीला कसे तोंड द्यायचे ही विवंचना आहेच. त्यात परदेशी संस्था विक्री थांबवायला तयार नाहीत. अवघे विश्व महागाईने बेजार झाले आहे. भारताने आतापर्यंत ही स्थिती उत्तम हाताळली आहे. पुन्हा आता घरातच निरनिराळी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे शेअर बाजार दिवसेंदिवस अधिकाधिक दिशाहीन होत चालला आहे. जुन्या म्हणीत बदल करून ‘बाहेरचे झाले थोडे आणि घरचेच करतात राडे’ असे म्हणावेसे वाटते.