क्रीडांगण । किशोर पेटकर
११९ वर्षांच्या दीर्घ इतिहासात प्रथमच क्रिस्टल पॅलेसने मोठा करंडक उचलला! ऑलिव्हर ग्लास्नर यांच्या नेतृत्वाखाली संघाने मातब्बर मँचेस्टर सिटीला एका गोलने नमवून एफए कपवर कब्जा केला आणि ऐतिहासिक वेम्बली स्टेडियमवर चाहत्यांनी जल्लोष केला.
इंग्लिश फुटबॉलमधील एक जुना, लोकप्रिय क्लब म्हणजे क्रिस्टल पॅलेस. तब्बल ११९ वर्षांची परंपरा लाभलेला हा संघ सप्टेंबर १९०५मध्ये स्थापन झाला. या दीर्घ प्रवासात क्लबने अनेक चढ-उतार, निराशा आणि कटू क्षण अनुभवले.