
डॉ. अविनाश भोंडवे
भारतीय आहारपद्धती प्रमाण मानली, तर ढोबळमानाने भारतीयांचे तीन प्रकार पडतात. मांसाहारी, शाकाहारी आणि अधूनमधून मांसाहार करणारे (मिश्राहारी). २०२४मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार भारतात २९.५ टक्के लोक शाकाहारी आहेत, तर ४२.८ टक्के व्यक्ती मिश्राहारी आणि सुमारे २६.७ टक्के व्यक्ती पक्क्या मांसाहारी आहेत. फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, तेलंगणा राज्यात ९८.७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ९८.५५ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये ९८.२५ टक्के व्यक्ती नित्य मांसाहारी आहेत.