

Dante De Monarchia
esakal
दान्तेला अभिप्रेत असलेला सत्ताधीश ‘Monarch’ एखाद्या विशिष्ट राष्ट्राचा नसून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आहे! याचा अर्थ हा, की त्याला विश्वराज्यासारखे काहीतरी अभिप्रेत आहे. कारण त्याशिवाय संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित होणार नाही. इस्पेन यांचे असेही निरीक्षण आहे, की आधुनिक काळातील जर्मन तत्त्ववेत्ता हेगेल याने मांडलेल्या सिद्धांताची मुळे दान्तेच्या मांडणीत सापडतात.
ख्रिस्ती आणि इस्लामी अशा दोन्ही धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र स्थळ असलेल्या जेरूसलेम शहरावर ताबा मिळवण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांमध्ये कित्येक वर्षे रक्तरंजित संघर्ष जारी होता. त्याला इतिहासकारांनी धर्मयुद्ध (Crusade) असे समर्पक नाव दिलेले आहे. खरेतर या शहराचा खरा हकदार यहुद्यांचा धर्म होता, ज्यापासून पुढे हे दोन धर्म निघाले. तथापि, एव्हाना यहुदी किंवा ज्यू धर्मियांना मायदेश सोडून जगभर जागा मिळेल तेथे परागंदा व्हावे लागले होते. या स्थळावर दावा सांगून त्याच्यासाठी युद्ध करायचे सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हतेच.