

JFK assassination records
esakal
‘ॲसॅसिनेशन रेकॉर्ड््स रिव्ह्यू बोर्डा’ने वॉरन आयोगाने केनेडी हत्येबाबत केलेल्या चौकशीची जवळजवळ ५० लाख कागदपत्रे जाहीर केली. २०१७मध्ये ट्रम्प सरकारने २,८०० गोपनीय फायली खुल्या केल्या. २०२३मध्ये बायडेन सरकारने १७ हजारांहून अधिक गोपनीय कागदपत्रे जाहीर केली. आता सुमारे ६३ हजार ४०० कागदपत्रे खुली झाली आहेत. आणि त्यातून काय बाहेर आले?
अमेरिकेतील न्यायालय. वातावरणात वादळापूर्वी असते तशी शांतता आहे. प्रेक्षकांच्या, वकिलांच्या, ज्युरींच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसतो आहे. डिस्ट्रिक्ट ॲटर्नी जिम गॅरिसन यांचा युक्तिवाद सुरू आहे. सरकारी पक्षाचा दावा आहे, की प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील त्या अखेरच्या एका गोळीने त्यांचा घात केला. गॅरिसन आता त्याच गोळीची कहाणी सांगत आहेत. जादूचीच गोळी म्हणावे लागेल तिला. कारण, सरकारी कथनानुसार केनेडी आणि त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेले गव्हर्नर कॉनेली यांना ज्या सात जखमा झाल्या, त्या त्या एकाच गोळीने केल्या. कसे झाले हे?