

Marathi Poetry Collection
esakal
दीपालीची कविता नवी आहे, फ्रेश आहे, पूर्वसुरींच्याच परंपरेची आहे; पण तिच्यावर थेट कोणाचा प्रभाव आहे असेही नाही. ती शुद्ध आहे, ‘असंख्य वादळातही गळ्यात शुद्ध तान’ मागणारे स्थैर्य या कवितेत आहे; पण सोबतच दीपाली म्हणते तसे वेदनेचे पांग फेडून जाणारी ही कविता आहे.
नकळत येती ओठांवरती, तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन, दिमाखात हा उभा बहावा ।
बहावा नावाच्या एका देखण्या वृक्षाचे वर्णन करणाऱ्या या ओळी मी चारेक वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर ज्येष्ठ साहित्यिका इंदिरा संतांच्या कवितेच्या ओळी म्हणून वाचल्या. पाठोपाठच काही दिवसांनी ही ‘बहावा’ नावाची कविता इंदिरा संतांची नसून दीपाली ठाकूर या कवयित्रीची आहे असेही समजले. या कवितेप्रमाणेच दीपाली ठाकूर हे नावही पहिल्यांदाच ऐकले. तेव्हापासून या कवयित्रीविषयी आणि तिच्या इतर रचनांविषयी उत्सुकता निर्माण झाली. सुदैवाने पाठोपाठ समाज माध्यमातून तिची ओळख आणि पुढे भेटही झाली.