Premium|Migration: आशिया आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांवर पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांचा अवलंब का?

Globalization: विकसित देशांना त्यांची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी आशियाई आणि आफ्रिकी स्थलांतरितांवर अवलंबून का राहावे लागण्याची ही आहेत कारणे..
immigration

immigration

Esakal

Updated on

भवताल वेध । मधुबन पिंगळे

युरोपीय देशांच्या लोकसंख्येचा समतोल बदलत असून, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम या देशांच्या अर्थव्यवस्थांवरही झाला आहे. तरुणांची लोकसंख्या वाढणाऱ्या आशियाई आणि आफ्रिकी देशांना या बदलांचा फायदा होणार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांचा विकासदर कायम राखण्यामध्ये या स्थलांतरितांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरेल.

स्थलांतर हा जागतिकीकरणाचा अपरिहार्य घटक आहे. त्यामुळेच तीन-चार दशकांमध्ये जागतिकीकरणाचा वेग वाढत असताना, जगभरामध्ये स्थलांतराचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्या, तरीही जागतिकीकरणाचा सर्वांत आधी आणि सर्वाधिक फायदा घेतलेल्या पाश्चिमात्य देशांमध्ये स्थलांतराला विरोध होत आहे. मात्र, अर्थव्यवस्था गतिमान आणि विस्तारणारी ठेवण्यासाठी आवश्यक आणि कुशल मनुष्यबळाचे स्थलांतर अपरिहार्य ठरते. युरोपसह विकसित देशांमधील लोकसंख्येचा समतोल बदलत असून, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आशिया आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे.

अमेरिकेतील कॅन्सासच्या मध्यवर्ती बँकेची जॅक्सन होल आर्थिक परिषद नुकतीच झाली. या बँकेच्यावतीने दरवर्षी आर्थिक परिषद होते आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हानांवर यामध्ये चर्चा होत असते. पाश्चिमात्य व्यवस्थेतील सर्व प्रमुख देश आणि संघटना यामध्ये भाग घेतात. यावर्षी झालेल्या परिषदेमध्ये लोकसंख्येचा समतोल आणि त्यातून अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विकसित देशांमधील लोकसंख्येचा समतोल बदलत असून, ६५ वर्षांवरील लोकसंख्या वाढत आहे, हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. यामध्ये ब्रिटन, जपान आणि युरोपातील काही महत्त्वाच्या देशांच्या अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यामध्ये स्थलांतरित कामगार आणि कर्मचाऱ्यांची भूमिका आत्ताच महत्त्वाची झाली आहे. पुढील दशकामध्ये हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com