
सोनिया उपासनी
डेनिम हा प्रकार सगळ्यांच्याच आवडीचा आहे. या ना त्या प्रकारातले डेनिम प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये आढळतेच; कधी पँटच्या रूपात, तर कधी ड्रेसच्या रूपात! डेनिमचे कपडे कधीच आउट ऑफ फॅशन होत नाहीत. उलट दरवेळी कुठलातरी फॅशन डिझायनर डेनिमची नवीन फॅशन मार्केटमध्ये आणून आपल्याला आश्चर्यचकित करतो. ज्याला आपण सरसकट जीन्सचे कापड म्हणतो, त्या डेनिमच्या कापडापासून पाश्चात्त्य आणि पारंपरिक अशी दोन्ही प्रकारची आउटफिट्स तयार करता येतात, हे विशेष.