Premium|Desk Job Syndrome : तासन्‌तास बसण्यामुळे वाढतोय मणक्याचा त्रास; जाणून घ्या बचावाचे उपाय

Back Pain Prevention : संगणकासमोर तासन्‌तास बसण्याच्या सवयीमुळे मानदुखी, पाठदुखी आणि मणक्याच्या समस्या वाढत आहेत. योग्य पोस्चर, नियमित हालचाल आणि छोटे ब्रेक घेऊन डेस्क जॉब सिंड्रोमपासून बचाव करता येतो.
Back Pain Prevention

Back Pain Prevention

esakal

Updated on: 

डॉ. सुबोध देशमुख

आपले शरीर सलग बसण्यासाठी तयार झालेले नाही. सलग एका तासापेक्षा जास्त वेळ बसल्यास मणक्याच्या चकत्यांमधील द्रव आटू लागते आणि रक्ताभिसरण मंदावते. दर तासाला अलार्म लावून पाच मिनिटांसाठी खुर्चीवरून उठावे. थोडे चालावे, पाणी प्यावे किंवा उभे राहून शरीर ताणावे. हा पाच मिनिटांचा ब्रेक कामाची उत्पादकता वाढवतो आणि पाठीचे आजार होण्यापासून वाचवू शकतो.

आजच्या डिजिटल युगात संगणकासमोर तासन्‌तास बसून काम करणे ही बहुतांश नोकरदार आणि व्यावसायिकांची गरज झाली आहे. तासन्‌तास बसल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयींमुळे मानदुखी, पाठदुखी आणि मणक्याचे त्रास वेगाने वाढत आहेत. वैद्यकीय भाषेत याला ‘डेस्क जॉब सिंड्रोम’ किंवा ‘टेक नेक’ म्हटले जाते. कामाच्या ठिकाणचा वाढता मानसिक ताण आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करते. वेळेत योग्य काळजी न घेतल्यास मणक्याच्या चकत्या (डिस्क्स) सरकणे किंवा त्यांमधील गॅप वाढणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. आपली बसण्याची पद्धत (पोस्चर) सुधारून आणि जीवनशैलीत थोडे सोपे बदल करून मानदुखी, पाठदुखीपासून कसा बचाव करावा हे काही मुद्द्यांमधून सोप्या भाषेत समजून घेऊ या.

Back Pain Prevention
Premium|Vidarbha Heatwave Capital Temperature Records : 'विदर्भातला उन्हाळा नको गं बाई!' १० वर्षांत प्रथमच एप्रिल महिन्यात पारा चाळिशीपार!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com