

Dessert photography
esakal
फोटो बघणाऱ्याला डिझर्ट ताजं आणि खरं वाटलं पाहिजे. तुम्ही काढलेला फोटो पाहताना केवळ पदार्थाच्या सौंदर्याची नाही, तर चवीची आणि वासाचीही अनुभूती मिळाली पाहिजे. फोटो पाहून जर बघणाऱ्याच्या मनात ‘हे आत्ताच्या आत्ता खावंसं वाटतंय’ अशी भावना निर्माण झाली, तर तो फोटो आपलं काम यशस्वीपणे करतोय असं समजावं. डिझर्ट फोटोग्राफीचा खरा उद्देश तिथंच तर पूर्ण होतो!
एका फूड फोटोग्राफरचा अन्नपदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. फोटो बघून तो पदार्थ ताजा वाटायला हवा हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. एखादा पदार्थ कॅमेऱ्यात कैद करण्याआधी त्याचा जणू अभ्यास करावा लागतो. हा पदार्थ काय सांगतोय, तो कुठल्या क्षणाशी जोडलेला आहे, आणि पाहणाऱ्याच्या मनात तो कोणत्या चवीचं सेन्सेशन जागं करणार आहे, याचा विचार करावा लागतो. म्हणूनच फूड किंवा डिझर्ट फोटोग्राफी ही तांत्रिक कौशल्याइतकीच भावना समजून घेण्याचीही कला आहे.