

Benefits of Gym on Mindset
esakal
प्रत्येकाच्या फिटनेस प्रवासात एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे ‘नेव्हर गिव्ह अप’ अॅटिट्यूड!! जिममुळे कुणी रागावर नियंत्रण मिळवतं, कुणी आत्मविश्वास परत मिळवतो, तर कुणी मनःशांती... अशाच काहींच्या आयुष्यात जिमनं केलेले बदल वाचायलाच हवेत.
सआजकालच्या ट्रेंडनुसार अनेकजण बॉडी बनवण्यासाठी किंवा ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी जिमचा आधार घेतात, परंतु मी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिमला जाणं सुरू केलं. सुरुवातीला शरीर खूप थकायचं, पण सातत्य आणि जिद्द यामुळे हळूहळू माझं त्या वातावरणाशी जुळत गेलं. जिममधली गाणी, सोबत वर्कआऊट करणारे लोक आणि त्यांची फिट शरीरयष्टी यामुळे प्रेरणा मिळते. माझ्या मते फिट राहण्यासाठी जिम २५ टक्के आणि डाएट ७५ टक्के हवं. कमी साखर, कॅलरीज आणि प्रोटीन रिच अन्न खायला हवं. एखाददिवशी जिम स्किप झालं, की कशाचीतरी कमतरता असल्याचं जाणवतं. माझ्यासाठी जिम फक्त स्ट्रेस कमी करण्याचं साधन नसून, एक चांगलं व्यक्तिमत्त्व घडवण्याचं माध्यम आहे. माझी पर्सनॅलिटी बघून अनोळखी लोकसुद्धा जेव्हा कौतुक करतात, तेव्हा वेगळाच आनंद होतो.
- अथर्व सुडके