

Destination Resort Wedding
esakal
रोजच्या जबाबदाऱ्या, डेडलाइन्स आणि सततच्या धावपळीत ‘विश्रांती’ ही गोष्ट आज लक्झरीपेक्षा गरज बनली आहे. स्पा, ॲडव्हेंचर, ॲग्रो, थीमबेस्ड रिसॉर्ट्स लोकप्रिय होत आहे. जीवनशैलीचा एक भाग बनत चालली आहे. विश्रांतीपासून नातेसंबंधांना वेळ देण्यापर्यंत अनेकांसाठी रिसॉर्ट हे आता मन आणि शरीर चार्ज करण्याचं विश्वसनीय ठिकाण ठरू लागलं आहे.
रोजच्या व्यग्र वेळापत्रकातून मोकळा, निवांत असा वेळ फारच कमी मिळतो. या मिळालेल्या वेळेत ‘काहीतरी वेगळं अनुभवता येईल का?’ याकडे सध्या लोकांचा जास्त कल आहे. तिथूनच रिसॉर्ट या संकल्पनेचा जन्म झाला असावा. सुरुवातीला ही कल्पना युरोपमध्ये विशेषतः फ्रान्स व इटलीमध्ये लोकप्रिय झाली. लोक समुद्रकिनाऱ्यावर किंवा पर्वतरांगांमधील सुंदर ठिकाणी काही दिवसांसाठी राहून विश्रांती घेत. त्यानंतर ही संकल्पना जगभर पसरली. मागील काही दशकांमध्ये भारतातही ही संकल्पना वेगाने रुजली आहे. आता जागोजागी आपल्याला स्पा रिसॉर्ट, ॲडव्हेंचर रिसॉर्ट, ॲग्रो रिसॉर्ट अशा अनेक रूपातली रिसॉर्ट्स पाहायला मिळतात.