

Diabetes Reversal
esakal
डॉ. सुबोध देशमुख
डायबेटिस रिव्हर्सल हा एक प्रवास आहे, तो कोणताही शॉर्टकट नाही. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मार्गदर्शनाखाली केलेली जीवनशैलीतील सुधारणा केवळ तुमची साखरच नाही, तर तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारते आणि हेच खऱ्या अर्थाने ‘रिव्हर्सल’ आहे.
आ ज भारताला जगाची ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटले जाते. सद्यःस्थितीत जवळपास प्रत्येक घरात किमान एक तरी व्यक्ती मधुमेहाशी झुंजताना दिसते. अनेक रुग्णांमध्ये असा समज असतो, की एकदा मधुमेह झाला तर आयुष्यभर गोळ्या किंवा इन्सुलिन घेणे अनिवार्य आहे आणि रक्तातील साखर कधीच पूर्णपणे नियंत्रित होऊ शकत नाही. परंतु हे पूर्ण सत्य नाही.