डॉ. दिलीप देवधर
आपला भारतीय शाकाहारी आहार हा चतुरस्र व समतोल असाच असतो. खरेतर वेगळे काही करायला लागत नाही. प्रत्येक स्थानिक ठिकाणी जे पिकते, तेच पदार्थ योग्य प्रमाणात खावेत, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको!
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. घरात सर्वांसाठी सारखाच स्वयंपाक केला जायचा आणि घरातील सगळेच कुरकूर न करता जेवत असत, कारण घरच्या स्त्रिया परिस्थितीनुरूप आणि समतोल आहार मिळेल असाच स्वयंपाक करत असत. सर्वजण कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हे अन्नपदार्थ खात असत आणि सर्वांचे शारीरिक आरोग्य चांगले राहत असे.