
किशोर पेटकर
क्रीडांगण । अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धिबळ विश्वकरंडकाचा अंतिम सामना जिंकून विश्वकरंडक आपल्या नावावर केला. बुद्धिबळात विश्वकरंडक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिलादेखील ठरली आहे. दिव्याच्या परिपक्व खेळाने आणि हंपीच्या पुनरागमनातील जिद्दीने संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय महिला बुद्धिबळाकडे वळले आहे.