
Fusion Karanjya
sakal
मधुराणी सप्रे
...मग मी मोदकांचं किंवा ओल्या नारळाच्या करंजीसाठीचं सारण केलं. मस्त जायफळ, खसखस आणि खराखुरा गूळ घालून. ते त्या टॉर्टियामध्ये भरून दुधाचं बोट लावून ‘करंजी’ बंद केली. कातणीनं तिला थोडा आकारबिकार दिला, तुपाचं बोट लावलं आणि दिलं ठेवून ओव्हनमध्ये. आणि अहो आश्चर्यम्! १५ मिनिटांत ओल्या नारळाच्या खुसखुशीत ‘एम्पनाडा करंज्या’ बाहेर पडल्या!