positive thinking
Esakal
संपादकीय
दिवाळीचा सण नुकताच संपला. आप्तेष्टांच्या, मित्रांच्या भेटी झाल्यामुळं एक नवं चैतन्य प्रत्येकामध्येच फुललं असणार! दिवाळीमुळं निर्माण झालेलं आजूबाजूचं वातावरण, वर्षातून एकदाच येणाऱ्या आनंदाच्या सणामुळं प्रफुल्लित झालेल्या चित्तवृत्ती, घरातील प्रत्येक घटकाचा विचार करून योजलेला दिवाळीचा प्रत्येक दिवस यांमुळं आपण या दिवसांत प्रसन्न असतो, प्रसन्न दिसतो... हाच उत्साह, हीच मानसिकता आपण वर्षभर का ठेवू शकत नाही, असा विचार अनेकदा मनात डोकावून जातो.
आयुष्य खरंच खूप खडतर झालं आहे. मनुष्य घड्याळ्याच्या काट्याला बांधला गेला आहे. नोकरी, शिक्षणापासून संसारातील अनेक व्यवधानांचा सामना करताना प्रत्येकच जण अक्षरशः पिचून जातो. यातून मनुष्याच्या आयुष्यात सुख-दुःख, यश-अपयश, आनंद-खिन्नता या सर्व भावना एकत्र विणल्या जातात. प्रत्येक दिवस नवी आव्हानं घेऊन येतो. काही वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी असते, तर काही वेळा नाही. पण अशा प्रत्येक क्षणी सर्वांत महत्त्वाचं असतं ते मन प्रसन्न ठेवणं. अनेकदा परिस्थिती आपल्या हातात नसतेच.