Premium|America first: अमेरिकेच्या आयात धोरणामुळे जगात उलथापालथ; ट्रम्पच्या धोरणांचा जागतिक परिणाम

global impact: अमेरिकेच्या आयात धोरणामुळे जागतिक अस्थिरता; ट्रम्पच्या धोरणांचा परिणाम
America first imact

America first imact

Esakal

Updated on

विश्‍वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे

थोडक्यात अमेरिकेचे हितसंबंध पहिल्यांदा, मग इतर गोष्टी, असा ट्रम्पसाहेबांचा खाक्या १९८७मध्येच समजून आला होता. आज ट्रम्पकडून जे राजकारण चालले आहे, अमेरिकेच्या आयात शुल्काविषयीच्या नव्या धोरणामुळे जगात जी उलथापालथ होत आहे आणि सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे, त्याचे सूचन या त्यांच्या खुल्या पत्रातून होते.

अमेरिकेच्या एकूणच जगाशी आणि त्यातल्या त्यात युरोपशी आणि त्यातही परत इंग्लंडशी असलेल्या संबंधांत कशी स्थित्यंतरे होत गेली आणि त्यांचा जगाच्या जडणघडणीवर काय परिणाम झाला हे लक्षात घेतले, तर आजच्या आणि अर्थातच उद्याच्याही राजकारणात तिची भूमिका महत्त्वाची ठरली व ठरणारही आहे यात संशय उरत नाही. या स्थित्यंतरांच्या चर्चेत अमेरिकेच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि अर्थात स्वप्रतिमेतही काय बदल झाले, त्यांचा जगावर काय परिणाम झाला तिकडेही लक्ष द्यावे लागेल.

सुरुवात करताना उलट दिशेने म्हणजे वर्तमानाकडून करू. आजचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची ही दुसरी खेप आहे. याआधीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले, तरी बायडनच्या अगोदर म्हणजेच बराक ओबामानंतरचे अध्यक्ष म्हणून ट्रम्पच निवडून आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com