Premium|Dot and Her Father : बाबांच्या एकटेपणाची जाणीव झालेली आठ वर्षांची डॉट; हळव्या नात्याची गोष्ट

Father Daughter Emotional Bond : स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य मोर्कोटे गावात बाबा आणि मुलगी डॉट यांचं छोटंसं जग आहे. वडिलांच्या एकटेपणाची जाणीव होऊ लागलेल्या डॉटच्या निरागस नजरेतून उलगडणारं हळवं नातं मनाला स्पर्श करतं.
Father Daughter Emotional Bond

Father Daughter Emotional Bond

esakal

Updated on: 

प्राची तडाखे, कोल्हापूर

डॉट जशी आठ वर्षांची झाली, तशी तिच्या निरागस मनात एक अस्वस्थ करणारी जाणीव घर करू लागली. ती बाबाकडे अधिक बारकाईने पाहू लागली. त्याचे खांदे थकल्यासारखे वाटत. जेव्हा तो लिहिता लिहिता खिडकीबाहेर पाहत बसे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एकटेपणाची उमटलेली रेषा तिला दिसे. रात्री झोपल्याचे भासवून ती अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असे.

स्वित्झर्लंडच्या दक्षिण टोकाला इटलीच्या सीमेवर मोर्कोटे नावाचे लहानसे व देखणे गाव होते. त्या गावाच्या शेवटच्या टोकाला, जिथे माणसांची वर्दळ कमी असायची आणि निसर्ग अधिक गहिरा व्हायचा, तिथे चेस्टनट आणि लार्च वृक्षांच्या गर्द सावलीत एक पांढरेशुभ्र लाकडी घर उभे होते. घर तसे लहानच होते, पण भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटली होती, ऐसपैस चौकटी असलेल्या खिडक्या होत्या, बर्फाच्छादित शिखरांकडे बघण्यासाठी एक मोठी काचेची खिडकी होती आणि अंगणात जांभळी, नारिंगी व तांबडी जरबेराची फुले बहरली होती.

या घरात दोनच माणसे राहत असत. पोप आणि डॉट. पोप चाळिशीतला, शांत, करड्या-निळ्या डोळ्यांचा माणूस होता. त्याच्या भव्य कपाळावर आणि डोळ्यांच्या कडांवर एकांताच्या, पण तितक्याच कोवळ्या प्रेमाच्या रेषा होत्या. व्यवसायाने तो लेखक होता. काल्पनिक गोष्टी लिहिणारा लेखक. पण गेल्या काही वर्षांत त्याने फारसे काही लिहिले नव्हते. डॉट म्हणजे त्याची आठ वर्षांची मुलगी. तिच्या सोनेरी व कुरळ्या केसांत, गुलाबी गाल आणि तपकिरी डोळ्यांत एक विलक्षण समजूतदार चमक होती. तिच्याकडे असलेली बर्फासारखी पांढरीशुभ्र, निळ्या डोळ्यांची स्नोवी नावाची मांजर या कुटुंबाचा अविभाज्य भाग होती. तिचे मऊ शरीर, शांत चाल आणि कायम पहारा देणारी नजर यांमुळे घरात एक वेगळीच ऊब असे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com