

Nature Conservation Literature Marathi
esakal
पुस्तक वाचताना आफ्रिकेतील घनदाट जंगले, हिमालयातील शुभ्र शिखरे आणि सह्याद्रीची पठारे डोळ्यांसमोर जिवंत उभी राहतात. हे पुस्तक केवळ निसर्गप्रेमी किंवा अभ्यासकांसाठी नाही, तर प्रत्येक सुजाण नागरिकासाठी आहे. ज्यांना निसर्ग समजून घ्यायचा आहे आणि ज्यांना जीवनाचा खरा अर्थ शोधायचा आहे, त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. खऱ्या अर्थाने ज्यांना निसर्ग कळला, त्यांचे ‘जी-वन’ कसे समृद्ध झाले, याचा हा एक अनुपम आणि प्रेरक दस्तावेज आहे.
नि सर्ग हा केवळ झाडे, वेली, डोंगरदऱ्या किंवा पशू-पक्ष्यांचा समूह नसून तो मानवी अस्तित्वाचा मूळ आधार आहे. आदिम काळापासून माणूस निसर्गाच्या कुशीत वाढला, पण आधुनिकतेच्या हव्यासामुळे आज आपण त्यापासून दुरावलो आहोत. याच निसर्गाशी ज्यांनी पुन्हा एकदा आपले घट्ट नाते विणले आणि आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग संवर्धनासाठी वाहिले, अशा महान जागतिक संशोधकांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारे पुस्तक म्हणजे डॉ. संदीप श्रोत्रीलिखित जी-वन त्यांना कळले हो! हे पुस्तक वाचकाला निसर्गाकडे पाहण्याची एक नवीन आणि संवेदनशील दृष्टी बहाल करते.