अरविंद रेणापूरकर
काही वर्षांपासून, प्रामुख्याने कोरोना काळानंतर, वाहन उद्योग अनेक अडचणींतून मार्ग काढत बदल घडवून आणत आहे. ग्राहक टिकवण्यासाठी जीवाश्म इंधनाकडून इलेक्ट्रिककडे वाटचाल करणाऱ्या वाहन उद्योगाने आता ‘गिअर’ बदलण्याची वेळ आली आहे. एकीकडे वाहनांतील तंत्रज्ञान अत्याधुनिक होत असताना वाहन क्षेत्रातील उलाढाल कमी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. एकाच किंवा ठरावीक देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा पर्यायी देशांची निवड करत स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीतही भर घालण्याच्या दृष्टीने रणनीती आखायला हवी.