
रोहित वाळिंबे
जगभरातील विविध देशांनी, विशेषतः उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी, गेल्या काही वर्षांत त्यांच्याकडील सुवर्णसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करायला सुरुवात केली आहे.
बदलती भू-राजकीय समीकरणे, विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि डॉलरच्या मूल्याची अस्थिरता या पार्श्वभूमीवर आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी हे देश सुवर्णसाठा वाढविण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.