

Hayli Gubbi volcano eruption
esakal
हायली गुब्बीच्या उद्रेकामुळे आकाशात १४ किलोमीटर उंचीपर्यंत राखेचे ढग पसरले, त्याचा परिणाम येमेन, ओमान, भारत आणि उत्तर पाकिस्तानवर झाला. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या जागतिक ज्वालामुखी संशोधन कार्यक्रमात नमूद केलेले आहे, की गेल्या सुमारे १२ हजार वर्षांत, शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी सुरू झालेल्या होलोसीन कालखंडात हायली गुब्बीचा कोणताही ज्ञात उद्रेक झालेला नाही.
आफ्रिकेच्या उत्तर इथिओपियामध्ये २३ नोव्हेंबरला तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता दीर्घकाळ निद्रिस्त (Dormant) असलेल्या हायली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे तांबड्या समुद्रावरून येमेन, ओमान आणि अगदी भारताच्या काही भागांवरही ज्वालामुखीय राखेचे लोट पसरले. १५ किलोमीटर उंचीवरून राखेचा हा लोट भारताकडे येत होता. त्यामुळे विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित झाली होती.