प्राची गावस्कर
कोणाचीही आर्थिक माहिती पूर्णपणे मिळणं शक्य नसतं. विशेषतः कर्ज असल्यास, त्याची माहिती नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार यांना असणं आणि असली तरीही त्यांनी ती मुलीच्या कुटुंबाला देणं असं सहसा होत नाही. त्यामुळे लग्न ठरण्यापूर्वीच मुलाच्या किंवा कुटुंबाच्या डोक्यावर कर्ज आहे का, असल्यास किती, याची खात्रीशीर माहिती मिळवणं कठीण असतं. ही समस्या या सिबिल स्कोअरमुळे दूर होईल. त्या आधारावर लग्नाचा निर्णय घेणं मुलींना सोपं जाईल.