Premium|Freelancing Opportunities : फ्रीलान्सिंगमुळे मिळते करिअरमध्ये स्वातंत्र्य आणि नवी ओळख

Freedom and Flexibility at Work : फ्रीलान्सिंगमुळे व्यक्तीला कामाचे स्वातंत्र्य, विविध प्रकल्पांचा अनुभव आणि कौशल्यांचा अधिक प्रभावी वापर करण्याची संधी मिळते. बदलत्या रोजगार क्षेत्रात हा पर्याय तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.
Freedom and Flexibility at Work

Freedom and Flexibility at Work

esakal

Updated on

सुमित डेंगळे

फ्रीलान्सिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही कुठल्या एका कंपनीला बांधील राहत नाहीत. कसंही, कधीही आणि कुठंही तुम्ही तुम्हाला आवडेल तसं काम करू शकता. एकावेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव घेताना तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकत जाता. नवी कामं, नव्या कंपन्या आणि नवी माणसं खूप काही शिकवतात. अनुभवाचा पट विस्तारतो. तुमच्या स्किल्सचा सर्वोत्तम वापर करण्यावर तुम्ही भर देऊ शकता.

फ्रीलान्सिंग ही संकल्पना फारशी नवीन नसली, तरी सध्या हा शब्द बरेचदा कानावर पडतो. अनेकदा फ्रीलान्स म्हणजे काय, हे आपल्याला नेमकं कळत नाही. फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये पगारी कर्मचारी म्हणून काम न त्यांच्यासाठी प्रोजेक्ट तत्त्वावर मुक्तपणे काम करणं. यात फक्त त्याच कंपनीसाठी काम करणं बंधनकारक नसतं, आपण एकापेक्षा अधिक कंपन्यांसाठीही काम करू शकतो. फ्रीलान्सिंगचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या निवडीबाबतीत मिळणारं स्वातंत्र्य. आवड आणि सवड या दोन्हीनुसार तुम्ही काम शोधू शकता. पूर्वी बरेचजण आयुष्यभर काम करत असलेल्या क्षेत्रात/ कंपनीत निवृत्तीनंतर फ्रीलान्सिंग करत असत. पण हल्ली हे समीकरण बदललेलं दिसत असून, तरुण पिढीसुद्धा फ्रीलान्सिंगकडे वळताना दिसते आहे. पूर्वी संधी नव्हती अशा अनेक क्षेत्रांमध्ये आता फ्रीलान्सिंगच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Freedom and Flexibility at Work
Premium|Conspiracy theories explained : गुंतागुंतीच्या जगात साध्या उत्तरांचा शोध! काय आहे 'षड्‌यंत्र सिद्धांतां'मागचे खरे मानसशास्त्र?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com