Premium|Conspiracy theories explained : गुंतागुंतीच्या जगात साध्या उत्तरांचा शोध! काय आहे 'षड्‌यंत्र सिद्धांतां'मागचे खरे मानसशास्त्र?

Psychological Myths : जगातील गुंतागुंत आणि गोंधळ टाळण्यासाठी मानवी मन 'षड्‌यंत्र सिद्धांतां'कडे आकर्षित होते; रोमन सम्राट निरोपासून सुरू झालेला हा प्रवास आणि त्यामागील मानसशास्त्रीय कारणांचा वेध घेणारा विशेष लेख.
Conspiracy theories explained

Conspiracy theories explained

esakal

Updated on

रवि आमले

लोकांना साधे, सोपे, स्पष्ट, सुसंगत असे भौतिक आणि सामाजिक पर्यावरण हवे असते. त्यातली गुंतागुंत, धूसरता, गोपनीयता, असुसंगतता, गोंधळ नको असतो. षड्‌यंत्र सिद्धांत या सगळ्यांची भरपाई करतात. वास्तविक जगातला गोंधळ, गुंतागुंत, धूसरता यांच्या तुलनेत ते काहींना हास्यास्पद वाटतील, पण इतरांसाठी अत्यंत साधे, स्पष्ट, समजण्याजोगे असतात.

षड्‌यंत्र सिद्धांत असंख्य आहेत. इंटरनेटवरील पानेच्या पाने त्यांनी भरलेली आहेत. हे स्वाभाविकच. अखेर शतकांची परंपरा आहे त्यांना. आता सर्वांत पहिला षड्‌यंत्र सिद्धांत कोणता हे सांगता येणे कठीण. पण बहुधा तो पहिल्या शतकात रोममध्ये जन्मास आला असावा.

रोम जळत असताना निरो हा फिडल नावाचे वाद्य वाजवत होता, ही आख्यायिका सर्वपरिचित आहे. ही आग लागली होती इ.स. ६४मध्ये. १८ ते २७ जुलै असे दहा दिवस हे तेव्हाचे जगातील सर्वांत मोठे शहर जळत होते. जॉन कॅरे संपादित फेबर बुक ऑफ रिपोर्ताजमध्ये तत्कालीन रोमन सिनेटर आणि इतिहासकार टॅसिटस याने लिहिलेला त्या घटनेचा वृत्तांत दिलेला आहे. यात टॅसिटस सांगतो, ‘‘अशी अफवा पसरली होती, की शहर जळत असताना निरो त्याच्या खासगी निवासस्थानी गेला आणि तेथे या संकटाची तुलना प्राचीन आपत्तींशी करीत, ट्रॉय उद्ध्वस्त झाले त्याची कहाणी गात बसला.’’ याच वृत्तांतात त्याने तेव्हाचा षड्‌यंत्र सिद्धांतही नोंदवला आहे. तो असा, की या शहराला निरोनेच आग लावली होती. ती का, तर त्याला त्याच्या नावाने नवे शहर उभारावयाचे होते. अशा अनेक कटकाल्पनिका तेव्हापासून लोकांनी जन्मास घातलेल्या आहेत. त्यांची केवळ ओळख करून द्यायची म्हटले, तरी आणखी दोन-तीन वर्षे हे सदर चालवावे लागेल. पण एक आहे, की त्या सिद्धांतांचे विषय भिन्न असले, निष्कर्ष वेगवेगळे असले, तरी त्या सर्वांत किमान पाच साम्ये तरी असतात.

Conspiracy theories explained
Premium|History of Artificial Intelligence : यंत्राला खरंच विचार करता येतो का? ७५ वर्षांपूर्वी ॲलन ट्युरिंग यांनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नाने जगाचे भविष्य कसे बदलले?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com