Premium|Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवातील २१ पत्री; निसर्गज्ञान, औषधी परंपरा आणि तिथींचे गणित सांगणारी परंपरा

Why Hartalika and Ganesh Chaturthi Fall on the Same Date : गणपतीच्या २१ पत्रींच्या परंपरेतून पूर्वजांचे निसर्गज्ञान जपले गेले आहे. यंदा हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येण्यामागचे तिथीचे गणितही समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे ज्ञान केवळ पुस्तकांत बंद करून ठेवले नाही, तर ते सण, पूजा, प्रथा आणि दैनंदिन जीवनात मिसळून पुढच्या पिढीकडे दिले. गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या २१ पत्रींची परंपरा त्याचेच एक सुंदर उदाहरण आहे. पावसाळ्यात आसपास दिसणाऱ्या विविध वनस्पतींची ओळख एका पूजेच्या माध्यमातून पिढ्यान्‌पिढ्या जपली जात आहे.दरवर्षी हरितालिका झाल्यावर दुसऱ्या दिवशी गणपती येतो, अशी आपली सवय. मग यंदा काय झाले? यावर्षी हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या. १४ सप्टेंबरला दोन्ही सण एकत्र येण्यामागे तिथींचे गणित आहे. दाते पंचांगानुसार, हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असून तृतीयेची समाप्ती सकाळी लवकर होत आहे.

यासाठी तारीख आणि तिथी यांच्यातला फरक समजून घ्यावा लागतो. आपली तारीख दिनदर्शिकेनुसार ठरते, तर तिथी सूर्य आणि चंद्र यांच्या परस्पर स्थितीवर आधारित असते. त्यामुळे आपल्या घड्याळात रात्री १२ वाजल्यानंतर कॅलेंडरवरचा दिवस बदलला तरी तिथी तेव्हा बदलत नाही. एखादी तिथी एका तारखेला सुरू होऊन पुढच्या तारखेपर्यंत जाऊ शकते. यंदा १४ सप्टेंबरला सकाळपर्यंत तृतीया असून त्यानंतर चतुर्थी सुरू होते. त्यामुळे एकाच तारखेला आधी तृतीया आणि नंतर चतुर्थी असा क्रम येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com