
मधुरा लिमये
बाप्पा दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व मात्र जाणवतं क्षणाक्षणाला. अगदी चराचरांत ते ओतप्रोत भरलंय, कुठल्या एका विशिष्ट रूपानं नाही तर विविध रूपांनी. खरं सांगू का? बाप्पाला कोणत्या व्याख्येत बसवताच येणार नाही. म्हणून तो फक्त आणि फक्त माझा ‘गणुल्याच’ आहे!