Premium|Global Ganesha traditions : भारताबाहेरील गणेशपरंपरा; आशिया, युरोप व अमेरिकेतल्या विविध रूपांचा ऐतिहासिक मागोवा

Unique Ganesh Forms in Nepal : भारताबाहेरील गणेशपरंपरेचा वेध घेताना नेपाळमधील नृत्यगणपती, सूर्यविनायक आणि सिद्धिविनायकाची वैशिष्ट्यपूर्ण रूपे समोर येतात. भारतीय कथांपेक्षा वेगळी मान्यता आणि प्राचीन संदर्भ या परंपरेला विशेष बनवतात.
Unique Ganesh Forms in Nepal

Unique Ganesh Forms in Nepal

esakal

Updated on

श्रुती भागवत

गणपती ही केवळ भारतापुरती मर्यादित असलेली देवता नाही. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये प्राचीन काळापासून गणेशाच्या मूर्ती, शिल्पे आणि उपासनेचे संदर्भ आढळतात. गणेशाच्या विविध रूपांचा प्रवास नेपाळ, थायलंड, बाली, चीन, जपानपासून मेक्सिको, रोम, इराण आणि फ्रान्सपर्यंत पाहायला मिळतो. स्थानिक संस्कृतीनुसार बदललेली ही रूपे आणि त्यामागील इतिहास निश्‍चितच रंजक आहे. भारताबाहेरील गणेशपरंपरेचा हा वेध...

नेपाळ

नेपाळमध्ये नृत्यगणपतीचा उल्लेख आढळतो. त्या उल्लेखानुसार तेथील नृत्यगणपती रक्तरंगाचा आहे. तो आपल्या मूषक वाहनावर उभा आहे. मूषकाच्या तोंडात चिंतामणी रत्न असून तो हिरव्या रंगाचा आहे. या नृत्यगणपतीला बारा हात आहेत आणि भारतातील द्वादशभुजांप्रमाणेच याही मूर्तीच्या हातात तंत्रमार्गाची चिन्हे व तशीच आयुधेही आहेत. फरक फक्त हातांमध्ये आहे. एका हातात मोदकाऐवजी चिंतामणी रत्न आहे. तंत्रमार्गी गणेशाच्या गळ्यात नररुंडमाला असते, त्याऐवजी या नृत्यगणपतीच्या गळ्यात आजानु चिंतामणिमाला आहे.

गणेशाच्या उत्पत्तीविषयीची कोणतीच भारतीय कथा नेपाळी लोकांनी स्वीकारलेली नाही. शिव-पार्वतीचा पुत्र अशी त्याच्याविषयीची कल्पना नाही. त्यांच्या मते, गणेश स्वयंभू असून एका सूर्यकिरणात त्याचे दर्शन झाले, म्हणून त्याला ‘सूर्यविनायक’ असे नाव पडले आहे.

दहाव्या शतकाच्या सुमारास नेपाळात भारताप्रमाणेच गणेशदेवता लोकप्रिय झाली होती आणि नेपाळी लोकांच्या देवतांमध्ये त्याला स्थान मिळालेले होते.

नेपाळमध्ये भूर्जपत्रावर लिहिलेला एक ग्रंथ उपलब्ध झाला आहे, त्यात गणपतीचे एक लहानसे चित्र असून त्याच्या आवाहनाचा मंत्र दिला आहे.

चंगुनारायण गावापासून तीन मैलावर शंकू नावाचे गाव आहे, त्या गावात सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे याच भागातील थानकोट या शहराच्या उत्तरेला एका लहानसा पर्वत आहे. तेथील मंदिरात गणपतीची मूर्ती असून विशेष म्हणजे गणपतीच्या शेजारी अष्टमातृकांच्या मूर्ती आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com