
अभिषेक वांढेकर
बाप्पासोबतच्या नात्याच्या प्रत्येक धाग्यात मला माझ्या आयुष्याचा खरा अर्थ आणि सच्चा आधार सापडतो. बाप्पा माझ्या प्रत्येक स्वप्नाचा साथीदार आहे. त्याच्या कृपेनंच मी उभा आहे, त्याच्यामुळेच मला भीती नाही, एकटेपणा नाही आणि त्याच्यामुळेच माझं आयुष्य एक सुंदर प्रवास आहे. या अविरत प्रेमाच्या नात्याला मी सदैव जपणार आहे, कारण बाप्पाच माझ्या हृदयाचं सारं सार आहे.