Premium|Genetic Engineering: जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे आरोग्य क्षेत्रात कोणते क्रांतिकारी बदल झाले..?

CRISPR-Cas9: जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती
Genetic Engineering

Genetic Engineering

Esakal

Updated on

डॉ. प्रकाश गंभीर

जेनेटिक इंजिनिअरिंगने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे. ह्यूमन जीनोम प्रोजेक्टपासून ‘नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग’, एनआयपीटी, पीजीडीसारख्या निदान पद्धती आणि क्रिस्पर-कॅस९सारख्या तंत्रज्ञानामुळे आनुवंशिक दोषांचे निदान, संशोधन व उपचारात अभूतपूर्व वेग आला आहे. डीएनएच्या भाषेवर प्रभुत्व मिळवत जेनेटिक इंजिनिअरिंगने आरोग्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले आहे.

सर्वसाधारणपणे ‘इंजिनिअर’ म्हटल्यावर आपल्यासमोर ओव्हर हॅट घातलेली, हातात स्क्रू ड्रायव्हर, पान्हा किंवा हत्यारे धरलेली व्यक्ती उभी राहते. या पारंपरिक प्रतिमेला यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी आव्हान दिले आणि आता जेनेटिक इंजिनिअर्सनीही शह दिला आहे. सॉफ्टवेअर किंवा जेनेटिक इंजिनिअर प्रत्यक्ष यंत्र दुरुस्त करत नाहीत, तरी त्यांच्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी साध्य होतात.

या दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे, त्यांची प्रणाली किंवा भाषा ही त्यांची कृती साध्य करण्याची किंवा परिणाम घडवून आणण्याची माध्यमं आहेत. मागील काही दशकांत जेनेटिक्सनं ‘डीएनए‘ या भाषेचं व्याकरण समजण्यात प्रचंड प्रगती केली आहे. डीएनए या भाषेवर मिळालेल्या प्रभुत्वामुळे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाने आता किती उच्च पातळी गाठली आहे, हे ह्यूमन जीनोम प्रोजेक्टमधील जीनोम सिक्वेन्सिंगच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com