

Geneva City Tourism
esakal
डॉ. शैलेश दत्तात्रय पवार
जिनिव्हा तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हा तलाव पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पर्यटक येथे नौकाविहार करण्याचा आनंद घेतात. तसेच तलावाकाठी बसून शांतता अनुभवू शकतात. जिनिव्हा तळ्यातील पाण्याचे भव्य कारंजे शहराला आकर्षक करते. सुमारे १४० मीटर उंचीपर्यंत वेगाने पाणी फेकणाऱ्या या कारंज्याचे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते. दिवसाच्या प्रकाशात तसेच रात्रीच्या विशेष रोषणाईमध्ये हे कारंजे पाहणे अविस्मरणीय अनुभवच आहे.
आयुष्यात एकदा तरी स्वित्झर्लंडला भेट देण्याचे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते. स्वित्झर्लंड म्हटले की डोळ्यांसमोर झुरिक, इंटरलाकन, लुसर्न, जुंगफ्राऊयोक, लाउटरब्रुनन व्हॅली, माउंट टिटलीस, सेंट मॉरिट्झ ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे येतात. परंतु, जिनिव्हा शहर क्वचितच टूर पॅकेजमध्ये असते. जिनिव्हाच्या भेटीचा आमचा अनुभव विलोभनीय होता. \