Premium|Geopolitics: हवाई हद्दीतील अर्थकारण आणि वेगाने होणारी स्थित्यंतरे

Aviation Economics: जगातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीचा आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम हवाई वाहतुकीवरही
Aviation Economics

Aviation Economics

Esakal

Updated on

भवताल वेध ।रोहित वाळिंबे

जगातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीचा आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम हवाई वाहतुकीवरही होत आहे. एखाद्या देशाच्या हवाई हद्दीतून परदेशी विमान उड्डाण करताना आकारले जाणारे शुल्क आज अनेक देशांसाठी महसुलाचा मोठा स्रोत ठरत आहे. अफगाणिस्तानसारख्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशांना याचा मोठा आधार मिळत असताना, काही देश त्यांची हवाई हद्द बंद करून भूराजकीय स्थानाचे महत्त्वही दाखवून देत आहेत. त्यामुळे हवाई हद्दीतील हे अर्थकारण सध्या वेगाने होणारी स्थित्यंतरे अनुभवत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलत्या भूराजकीय समीकरणांचा आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम केवळ व्यापार आणि आयात-निर्यात एवढ्यापुरताच मर्यादित नसून, हवाई वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. काही देशांसाठी ही इष्टापत्ती ठरत आहे, तर काही देशांना यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय माध्यमांत आलेल्या एका वृत्ताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते, ते वृत्त म्हणजे, ‘आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून अफगाणिस्तानला मिळणारा महसूल हा त्यांच्यासाठी मोठा आधार ठरू लागला आहे.’

गत जून महिन्यात इस्राईलने इराणच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने इराण आणि इराकने त्यांची हवाई हद्द विमान वाहतुकीसाठी काही काळ बंद केली होती. त्याचप्रमाणे या काळात जॉर्डननेही काही काळासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद ठेवले होते. मात्र या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय विमाने मार्ग बदलून अफगाणिस्तानसारख्या पर्यायी हवाई हद्दीतून उड्डाण करू लागली. या कालावधीमध्ये अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीमधून दररोज सुमारे ५० ते २८० विमाने जात होती, असे काही संस्थांचे म्हणणे आहे. आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानसाठी मात्र ही आयती संधी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com