Migration
Esakal
गोपाळ कुलकर्णी
जागतिकीकरणामध्ये जग जवळ आल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते वेगाने तुकड्यातुकड्यांमध्ये विभागले जाताना दिसते. स्थलांतरितांविरोधात भूमिपुत्रांची माथी भडकावण्याचे काम देशोदेशीच्या कट्टरपंथीय विचारधारेच्या संघटना करत आहेत. त्यातून ऑस्ट्रेलियातील निओ नाझी आणि सार्वभौम नागरिक यांसारख्या घटकांचा जन्म होताना दिसतो. या समस्येचे मूळ जसे विचारधारेमध्ये आहे तसेच ते अर्थकारणातही असल्याचे दिसून येते. शेवटी हा प्रश्न स्रोतांच्या समान वाटपाच्या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपतो.