Premium|Government Job Scam : सरकारी नोकरीच्या आमिषाला उच्चशिक्षित तरुणही बळी का पडत आहेत?

Government Job Fraud : उच्चशिक्षित तरुणही सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीला बळी पडत आहेत. वशिला, बनावट आश्वासने, टप्प्याटप्प्याने पैसे उकळणे आणि तक्रार करण्याची भीती यामुळे घोटाळ्यांचा धोका वाढतोय.
Government Job Fraud

Government Job Fraud

esakal

Updated on

अपूर्वा जोशी / मयूर जोशी

आश्‍चर्याची गोष्ट अशी, की नोकरीसाठी केल्या जाणाऱ्या फसवणुकीला बळी पडणारे बहुतेकजण अशिक्षित किंवा भोळेभाबडे नसतात. उलट चांगलं शिक्षण घेतलेले, इंटरनेट वापरण्यात तरबेज असलेले तरुणही या जाळ्यात सहज अडकतात. कारण फसवणूक करणारे इतक्या सफाईनं काम करतात, की सामान्य माणसाला खरं आणि खोटं यातला फरकच ओळखता येत नाही. हे संकट आज भारतासह जगभरातल्या लाखो कुटुंबांच्या मनाला घरघर लावत आहे...

भारतात तयार होत असलेला सरकारी नोकऱ्यांचा बागुलबुवा कालानुरूप मोठा होत चाललाय. पुण्याजवळ नुकतीच घडलेली घटना या सगळ्याचं उत्तम उदाहरण ठरावी. इथल्या आर्थिक गुन्हे शाखेनं एक रॅकेट उघडकीस आणलं, ज्यात एका व्यक्तीनं सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत सव्वीस बेरोजगार तरुण-तरुणींकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. चांगलं शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी न मिळालेले हे तरुण, नोकरी लवकर मिळावी या आशेनं आरोपीच्या ‘ओळखीतून काम होतंय’ या दाव्यावर सहज विश्वास ठेवते झाले आणि टप्प्याटप्प्यानं पैसे भरत गेले. सुरुवातीला थोडी रक्कम मागितली गेली, मग ‘फाइल पुढे सरकवण्यासाठी’ आणखी काही, नंतर ‘नियुक्ती पत्र काढण्यासाठी’ वेगळी रक्कम असं करत करत प्रत्येक पीडिताकडून टप्प्याटप्प्यानं खूप मोठी रक्कम उकळली गेली. प्रत्येक टप्प्यावर आरोपी इतका आत्मविश्वासानं बोलायचा, की पुढचा हप्ता भरण्याशिवाय कुणाला दुसरा पर्यायच सुचला नाही. तपासात आरोपीला अटक झाली, पण तोवर बराच उशीर झाला होता. खरी मेख इथंच आहे - सुरुवातीचे एक-दोन पीडित पैसे गमावल्यावरही तक्रार करायला घाबरतात, स्वतःच्याच भोळेपणाची लाज वाटते म्हणून गप्प बसतात, घरच्यांना काय सांगायचं या विवंचनेत राहतात आणि याच शांततेचा फायदा घेत आरोपी अनेक महिने आणखी लोकांना गंडवत राहतात. जोपर्यंत अनेकांच्या तक्रारी एकत्रित पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत तोवर खऱ्या अर्थानं या घोटाळ्यांचा नेमका आवाका समोर येत नाही. सरकारी नोकरीशी जोडलेलं स्थैर्य आणि प्रतिष्ठा आणि अधिकृत परीक्षा प्रक्रियेपेक्षा वशिल्यावर असलेला भाबडा विश्वास याच गोष्टींवर हे पूर्ण रॅकेट उभं होतं आणि नेमक्या याच मानसिकतेमुळे उच्चशिक्षित तरुणही सहज बळी पडले. सरकारी नोकऱ्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडताना दिसत आहेतच, त्यातच आता एआयमुळे या घोटाळेकारांच्या कार्यक्षमतेत अजूनच भर पडलेली दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com