मोनिका मयूर
गेल्या दशकभरात भारतामध्ये पाळीव प्राण्यांबाबतच्या दृष्टिकोनात हृदयस्पर्शी बदल घडून आला आहे. आता पाळीव प्राणी केवळ सोबती नाहीत, तर त्यांना कुटुंबातील सदस्य मानले जाते. पाळीव प्राण्यांची वाढती संख्या, शहरी जीवनशैली आणि प्राण्यांच्या कल्याणाविषयी जागरूकता यांमुळे भारतातील पेट केअर इकोसिस्टीम झपाट्याने विकसित होत आहे, आणि त्याचबरोबर पाळीव प्राणी विम्याचे महत्त्वही वेगाने वाढत आहे.
आपण स्वतःचे आरोग्य, वाहने, घरे आणि अगदी गॅजेट्ससुद्धा विम्याने सुरक्षित ठेवतो, तर मग आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या पाळीव प्राण्यांसाठी विमा का नसावा? पेट इन्शुरन्स म्हणजे लक्झरी नाही; तर हे आता अनेक कुटुंबांमध्ये एक गरजेचे साधन बनत चालले आहे.
पाळीव प्राणी विमा का गरजेचा?