प्रतिनिधी
शीख धर्माच्या अनुयायांसाठी गुरू नानक जयंतीला विशेष महत्त्व आहे. हा शीख धर्मातला अतिशय मोठा उत्सव. शीख धर्माचे प्रवर्तक आणि आद्यगुरू श्री नानक देवांचा हा जन्मदिवस. धर्म प्रवर्तक म्हणून पूजनीय असणाऱ्या गुरू नानक देवांनी आपल्या अनुयायांना प्रेरणा देताना अज्ञान दूर करून आध्यात्मिक शक्ती आत्मसात करण्यास प्रेरित केले होते.
कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्मिणेच्या दिवशी साजरा होणारा हा सण ‘गुरपूरब’ किंवा ‘प्रकाश पर्व’ म्हणूनही ओळखला जातो. शीख धर्मातल्या दहाही गुरूंचे वाढदिवस गुरपूरब म्हणून साधारण सारख्याच पद्धतीने जगभर साजरे होतात.