Premium|Guru Thakur: ‘‘मे आय?’’ कानामागून आलेल्या गोड आवाजानं मी दचकलो; पाहतो तर तीच..!

Guru Thakur's travel experience : स्वित्झर्लंडच्या थंडीत उलगडलेली एक अनोखी कहाणी; कवी, लेखक गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून...
travel experience and inspiration for sketching

travel experience and inspiration for sketching

Esakal

Updated on

गुरु ठाकूर

तिच्या एकंदरीत दिसण्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावण्याचा मी प्रयत्न करत होतो. ती नक्की शाळेतली किंवा फारतर ज्युनिअर कॉलेजमधली असावी. पौगंडावस्थेतल्या मुलांचे चेहरे रेखाटण्याचा आनंद वेगळाच असतो, कारण त्या डोळ्यांत एक उत्कंठा दडलेली असते आणि चेहऱ्यावर एक निरागसपणा. बालपण संपवून तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं राहायची ती वेळ. चित्र पूर्ण होईपर्यंत ही मुलगी खरोखरच स्थिर बसली, तर माझ्यासाठी ही सुवर्णसंधी असणार होती.

स्वित्झर्लंडमधल्या इंटरलाकेन नावाच्या स्थानकावर मी झुरिकला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत बसलो होतो. ते स्थानक एखाद्या हिलस्टेशनसारखं होतं. समोरच्या क्षितिजावर भव्य पर्वत बर्फाचा मुकूट धारण करून उभा होता, जणू काही इंटरलाकेनची राखण करत होता. आजूबाजूला मोजून तीन-चार माणसं होती. तापमान अाठ डिग्री असावं; अंगावरच्या उबदार कपड्यांतूनही ते बऱ्यापैकी जाणवत होतं. गाडी यायला अजून वीस मिनिटं तरी होती. मी तिथल्याच एका बाकावर ठाण मांडून सॅकमधलं स्केचबुक काढलं. नेमकं कुणाला रेखाटावं, याचा विचार करू लागलो. मी आजूबाजूला शोधक नजर फिरवली.

माझ्या बरोबर मागे एक युगुल रंगात आलं होतं. त्यांची प्रायव्हसी भंग होऊ नये म्हणून मी त्यांचं स्केच काढणं टाळलं. डाव्या हाताला काही फुटांवर एक म्हातारा, पोर्टर घालतात तसला एप्रन घालून बर्गर खात बसला होता. त्याचा एकूण आविर्भाव आणि पेहराव फारच वेधक होता. पण तो किती स्थिर बसेल? की खाऊन झाल्यावर लगेच तिथून निघून जाईल? हे प्रश्न मला पडले. मी शंकेची चटई अंथरण्याच्या आधीच त्यानं त्याचा बाडबिस्तरा आवरला आणि बर्गर खात पाठीवर सॅक टाकून तो जवळच्या पाणपोईकडे चालू लागला. तो उठताच माझं लक्ष त्याच्या मागच्या बाकावर गेलं. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही, कारण मला जे हवं ते तिथंच होतं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com