
आपले स्वास्थ्य निरामय राहण्यासाठी, विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी काही साध्या, सोप्या आणि प्राथमिक गोष्टींची माहिती आबालवृद्धांना असणे नक्कीच गरजेचे असते.
‘आरोग्यम् धन संपदा’ असे सुभाषितात सांगितले गेले असले, तरी आजच्या अर्थाधिष्ठित जगात धनप्राप्तीसाठी जेवढे प्रयत्न केले जातात, त्याच्या एक दशांशही प्रयत्न निरोगी राहण्यासाठी केले जात नाहीत.
स्वास्थ्यप्राप्तीसाठी फारशी आर्थिक धडपड करावी लागत नाही, पण बिघडलेले स्वास्थ्य परत मिळवण्यासाठी, डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सवर वारेमाप खर्च होत राहतो. यादृष्टीने स्वास्थ्य मिळवणे आणि ते राखणे हा एकापरीने आर्थिक बचतीचाच एक मार्ग ठरू शकतो.