Premium|Healthy Salad Recipes : आरोग्यदायी आणि चविष्ट तीन सोप्या रेसिपी; उन्हाळ्यात नक्की करून पाहा

Easy Indian Healthy Recipes : मूग पचडी, रंगीबेरंगी कोशिंबीर आणि काकडी-पोहे टिक्की या पौष्टिक, चविष्ट व सहज तयार होणाऱ्या रेसिपी उन्हाळ्यातील हलक्या, आरोग्यदायी आहारासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
Easy Indian Healthy Recipes

Easy Indian Healthy Recipes

esakal

Updated on

मूग पचडी

साहित्य

शंभर ग्रॅम मुगाची डाळ, ५० ग्रॅम बारीक चिरलेला कोबी,

१ बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ व साखर, अर्धा चमचा जिरे पूड, पाव चमचा मोहरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती

मुगाची डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवावी. भिजल्यानंतर त्यातील पाणी काढावे. आता कोबी व मुगाची डाळ एकत्र करावी. एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिरवी मिरची, मीठ व साखर घालावी व फोडणी तयार करावी. मूग डाळ व कोबीच्या मिश्रणावर जिरे पूड घालून फोडणी घालावी. वरून कोथिंबीर भुरभुरून मूग पचडी सर्व्ह करावी.

रंगीबेरंगी कोशिंबीर

साहित्य

प्रत्येकी ५० ग्रॅम लाल भोपळा, पांढरा भोपळा, गाजर, बीट व दही, चवीनुसार मीठ आणि साखर, अर्धा चमचा जिरे पूड,

१ बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरजेनुसार तेल, पाव चमचा मोहरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती

सर्वप्रथम लाल भोपळा, पांढरा भोपळा, गाजर व बीट स्वच्छ धुऊन घ्यावे. या भाज्यांच्या बारीक चौकोनी फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात सर्व फोडी घालून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यानंतर या भाज्यांमध्ये जिरे पूड, दही, मीठ व साखर घालावी. एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी वरून भाज्यांवर घालावी. कोथिंबीर भुरभुरून कोशिंबीर सर्व्ह करावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com