Premium|History of Cafe Culture in India : कॉफी हाऊसपासून आधुनिक कॅफे संस्कृतीपर्यंतचा रंजक प्रवास

Evolution of Coffee Houses : कॉफी हाऊसपासून आधुनिक कॅफे संस्कृतीपर्यंतचा प्रवास हा केवळ पेयांचा नाही, तर संवाद, मैत्री, संस्कृती आणि मानवी नात्यांना जपणाऱ्या सामाजिक अवकाशाच्या उत्क्रांतीची कहाणी आहे.
History of Cafe Culture in India

History of Cafe Culture in India

esakal

Updated on

काळ बदलला तसे कॅफेमध्ये बरेच बदल झाले. पण कॅफेचा मूळ हेतू मात्र आजही टिकून आहे. माणसांना एकत्र आणण्याची त्यांची ताकद अजूनही तशीच आहे, किंबहुना जास्तच बळकट झाली आहे. म्हणूनच आता कॅफेची ओळख म्हणजे फक्त कॉफी पिण्याची जागा इतकीच मर्यादित नसून, ती आता गप्पा, मैत्री, कल्पना, स्वप्न आणि आयुष्याचे काही निवांत क्षण असं बरंच काही साजरं करण्याची जागा, अशी झाली आहे.

तो ‘चहा’ आणि ती ‘कॉफी’... एक साधेपणाचं प्रतीक तर दुसरी थोडीशी रुबाबदार. चहाची सुर्रकी कधीही कुठंही आणि कोणासोबतही अनुभवता येते. कॉफीच मात्र तसं नाही हं, ती जरा भाव खाणारी. तिच्यासाठी मूड असावा लागतो. निवांत क्षण लागतात. म्हणूनच कुणा प्रिय व्यक्तीला खास कॉफी डेटवर नेलं जातं. चहाचं रूप जरा रांगडंच; कधी ठेचून आलं घालून, कधी वेलचीच्या सुगंधात, कधी गवती चहाच्या दरवळात ते खुलणार. पण कॉफीचा शृंगार मात्र निराळाच; ती कधी दाट फेसाळलेल्या थरात नटलेली, कधी चॉकलेटच्या भुरभुरीनं सजलेली, कधी कॅरॅमलच्या सोनेरी स्पर्शानं खुललेली, तर कधी क्रीमच्या शुभ्र मुकुटामुळे अधिकच मोहक झालेली, कधी थंडगार रूपात, तर कधी लाते आर्टच्या नाजूक नक्षींनी सजून प्रत्येक वेळी नव्यानं भेटणारी... ‘त्याची’ अमृतुल्यावर भेट होते, तर ‘तिला’ भेटण्यासाठी खास कॅफेत जावं लागतं.

कॅफेची सुरुवात...

अनेक शतकांपूर्वी मध्यपूर्व युरोपमध्ये लोक कॉफीचा घोट घेत घेत भेटीगाठी, चर्चा किंवा विरंगुळ्याची जागा म्हणून ‘कॉफी हाऊस’ किंवा ‘कॅफे’मध्ये जायचे. येमेनमधून सतराव्या शतकात भारतात आलेली कॉफी कर्नाटकातल्या चिकमंगळूर परिसरात चांगलीच रुजली आणि रुळली. मग पुढे ब्रिटिश काळात कॉफी हाऊसची संकल्पनाही भारतात आली. हळूहळू ती शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग झाली. १९३६मधल्या मुंबईतल्या चर्चगेटमध्ये इंडिया कॉफी हाऊस हे पहिलं अधिकृत कॉफी हाऊस सुरू झालं. पुढे काही वर्षांतच संपूर्ण देशभरात त्यांच्या ५०हून अधिक शाखा उभारल्या गेल्या. १९४२मध्ये कलकत्त्यामधल्या अल्बर्ट हॉल इमारतीत इंडिया कॉफी हाऊस - कॉलेज स्ट्रीट ही शाखा सुरू झाली. १९५७मध्ये दिल्लीत त्यांची अजून एक शाखा कॅनॉट प्लेस इथं सुरू झाली. हे नव्या सहकारी चळवळीअंतर्गत सुरू झालेल्या पहिल्या कॉफी हाऊसपैकी एक होतं. त्याच वर्षी बंगळूरमध्ये त्यांची एम.जी. रोडवर अजून एक शाखा सुरू झाली आणि यानंतर कॅफे संस्कृतीला एक नव रूप मिळालं. काही वर्षांतच पुणे, नागपूर, लखनौ, जबलपूर, पुद्दुचेरी अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या शाखा पसरल्या.

History of Cafe Culture in India
Premium|Amravati Animation Education :"तुला तल्लीन होऊन शिकायचंय का?" विजय राऊत यांच्या अमरावतीतील 'ॲनिमेशन गुरुकुल'ची यशोगाथा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com